घायाळ होणे म्हणजे

Started by SANJAY M NIKUMBH, November 15, 2013, 09:23:28 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

घायाळ होणे म्हणजे
==============
घायाळ होणे म्हणजे
तुझ्या डोळ्यांत पहाणे
तुझ्या एका कटाक्षाने
तुझा होऊन जाणे

घायाळ होणे म्हणजे
तुझ्याकडे बघणे
तू मंद हसतांना
तुझ्यात विरघळून जाणे

घायाळ होणे म्हणजे
तू अंबाडा घालणे
तुझ्या त्या लावण्याने
जीव गुदमरून जाणे

घायाळ होणे म्हणजे
तू केस मोकळे सोडणे
केसांत हात फिरवतांना
तुझ्यात गुंतून जाणे

घायाळ होणे म्हणजे
तुझा होऊन जगणे
तुझ्याकडे पाहता पाहता
मनास भोवळ येणे .
==============
संजय एम निकुंभ , वसई
दि. १५.११.१३ वेळ : ११ . ३० दु.