अश्रू फुले

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2013, 05:04:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अश्रू फुले

रात्रीच्या आधारात
बऱ्याचदा  त्यांचा जन्म,
अश्रुंची फुले होतांना,
केंव्हा तरी...

फक्त स्मरण त्यांचे आता,
पुष्पवासी अश्रुंचे थेंब
लाटा होऊन उरी उसळतांना,

असहाय उर फुटतो,
मग... मी,
वाहून जातो त्यात !

इथे नित्य काळोखात,
फुलांचे अश्रु होतात !
स्वासांची कोंडी  होतांना,
पुनःपुन्हा फुले बरसतात !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९