अजूनही ……

Started by SANJAY M NIKUMBH, November 17, 2013, 06:58:14 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

अजूनही ............................... संजय निकुंभ
================ ===========

अजूनही तो क्षण
डोळ्यासमोर फिरतो
अगदी ... जसाचा ... तसा

जेव्हा मला कळलं
तू माझा विश्वासघात केला आहेस

माझ्या पायाखालची जमीनच सरकलेली
अन तुझी नजर होती झुकलेली

माझ्या प्रेमाच्या अन विश्वासाच्या
ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्यास तू
ज्या प्रेमभावनेत मी जगत होतो
ते सुंदर जगणं
ओंजळीतून पाणी निसटून जावं
तसं निसटलं माझ्या मनातून

दोष सारा तुझाच होता
पण बळी मात्र माझ्या प्रेमाचा गेला
तू जे काही लपवंलस माझ्यापासून
" स्री " च्या मनावरचा विश्वासच उडाला

तरी दुभंगलेलं मन सावरून
मी आजही जगतोयं
अजूनही ................
तुझ्यावरच प्रेम करतोयं
अजूनही ................
तुझ्यावरच प्रेम करतोयं
=============================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ .११ . १३ वेळ : ८ .१५ रा.
https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl