कृष्ण राधा

Started by SANJAY M NIKUMBH, November 18, 2013, 07:10:21 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कृष्ण राधा........................संजय निकुंभ 
===================
तुझ्या प्रेमाची आग
माझ्या मनात जळत राहिलं
जरी कधीतरी मी
अनंतात विलीन होऊन जाईलं

शरीर तर मरणारच आहे
पण तुझं प्रेम
माझ्या आत्म्यासोबत
मी घेऊन जाईलं

जेव्हाही घेशील
तू पुढचा जन्म
त्या जन्मीही माझ्या प्रेमाला
मी ओळखून घेईलं

युगानयुगे आपलं प्रेम
असंच भेटत राहिलं
प्रत्येक जन्मी कृष्ण राधा म्हणून
हे जग आपल्याला ओळखत राहिलं
====================
संजय एम निकुंभ , वसई 
दि. १६ . ११ . १३  वेळ  : ५.४५ स.