"शब्द रुसून बसलेत"

Started by vaibhav_kul2003, November 19, 2013, 08:05:45 AM

Previous topic - Next topic

vaibhav_kul2003

"शब्द रुसून बसलेत"

दिलाय शाप माझ्या कवीतांना
शब्द रुसून बसलेत दूर
नाहीत कुठे दडलेले संकेत
नि नाहीत अर्थांचे धूर

उडून गेलाय ऊन वारा
नि  नाही चालींचे सूर
रेघच आता उमटत नाहीत
कसला हा शाप क्रूर

पाणावलेले डोळे घेउनी
वही आपले बडवतेय उर
समासही आता खाली झालेत
शब्दांना घेऊन गेलाय पूर

वैभव कुलकर्णी

Çhèx Thakare


मिलिंद कुंभारे

पाऊस शब्दांचा बरसेल कधीतरी
यत्न कर तू, तुला सूर गवसेल कधीतरी .....