रांगडा साजणं

Started by केदार मेहेंदळे, November 19, 2013, 05:00:22 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

  तरही गझल
मूळ गझल : - भृकुटीवरचा तीळ आवडे
गझलकार : - सुनेत्रा नाटेकर
मात्रा : - ८ + ८
(हि गझल मी माझा मित्र  गोविंद नाईक यास समर्पित केली आहे.)

रांगडा साजणं

भृकुटीवरचा तीळ आवडे
दाट मिशीचा पीळ आवडे

चुकून माझा पदर घसरता
मारतोस ती शीळ आवडे

कुरळ्या माझ्या बटा मोकळ्या
गुंतण्या तुला रीळ आवडे

मिठीत तुझिया विसावताना
आकाशाची नीळ आवडे

उर्मट भाषा तुझी ऐकता
टवाळांसही बीळ आवडे

भरवतोस ते पान चघळता
मुखी रंगली गीळ आवडे 

संपत असता जरा लांबण्या
घालतोस ती खीळ आवडे 

केदार  ....

हि गझल रांगड्या साजणा साठी असल्यानी या गझलेतील ''भृकुटीवरचा तीळ आवडे'' या उला मिसर्यातील "तीळ'' चा अभिप्रेत अर्थ ''चामखीळ'' असा आहे.

shashaank

अरेच्या, इथे तर मिलिंद, केदार सगळेच गजला लिहायला लागलेत की ....
वाहवा.. कोणा जाणकार गजलकाराला आमंत्रित करा म्हणजे ते गजलेचे तंत्र जमले का नाही ते समजू शकेल....

Çhèx Thakare