तुझ्यापासून दूर राहणे, मला खरं तर जमत नाही.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 20, 2013, 10:24:24 PM

Previous topic - Next topic
मी फक्त तुझाच आहे,
यावर तुझा का विश्वास नाही.....

तुच आहेस आयुष्यात माझ्या,
तुझ्याशिवाय माझं कोणच नाही.....

झोपेत असताना देखील बडबडतो मी,
निवांत झोपही आता लागत नाही.....

स्वप्नातही तुच दिसतेस मला,
सत्यातही तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही.....

ह्रदयातही तुच स्पंदतेस,
तुझ्याविणा ह्रदयही धडकत नाही.....

आता नको ना छळूस एवढं,
तुझ्याविणा आता खरच राहवत नाही.....

कारण ???

तुझ्यापासून दूर राहणे,
मला खरं तर जमत नाही.....
:-*   :D    :-*

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २०-११-२०१३...
रात्री ०९,०६...
© सुरेश सोनावणे.....

pujjwala20