कुणाचे जनुक वाहतो मी

Started by विक्रांत, November 20, 2013, 10:49:18 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कुणाचे जनुक वाहतो मी
लाखो वर्षापासून इथे
कडेकपारीत राहणाऱ्या
आदिम वनचरांचे
कि दक्षिणेत फुललेल्या
संपन्न कलासक्त द्रविडांचे
आपली संस्कृती आणि तत्वज्ञान
इथे रुजवणाऱ्या आर्यांचे
कि धर्माच्या नावाने
जीवावर उदार होवून
वादळागत आलेल्या
कर्मठ यवनांचे
किंवा जग जिंकण्याच्या
इर्षेने निघालेल्या लढवय्या
ग्रीक, हुणांचे
वा आपल्याच देशातून
परागंदा झालेल्या
यहुदी, पारश्याचे
कधी कधी वाटते
या साऱ्यांच्या जनुकांचे
पिढ्यान पिढ्यांच्या संक्रमनांतून
मिश्रण माझ्यात होवून
मी घेवून आलोय
एक माझे मी पण
जे सांगते नाते माझे
या प्रत्येकाशी
म्हणून
प्रत्येक धर्माचा, जातीचा
प्रत्येक वर्णाचा, भाषेचा
अनोळखी वा ओळखीचा
मला कधीच वाटत नाही परका
त्यांच्या रक्तातील जीवन संगीत
माझ्या रक्तात असते गुंजत
त्यांच्या नकळत असते मला सांगत
त्याचे माझे आदिम नात

विक्रांत प्रभाकर

sweetsunita66

छान ,पण ही कविता गंभीर कशी ?