फक्त तु आणि मी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 21, 2013, 07:54:07 PM

Previous topic - Next topic
फक्त तु आणि मी...!!♥

अशीच आलीस तु आयुष्यात,
घर केले माझ्या ह्रदयात.....

मला पाहून हसलीस गालात,
हळूच लाजून love u बोललीस कानात.....

माझ्यावरचे प्रेम दिसले,
तुझ्या अबोल डोळ्यात.....

मलाच माझ्यापासून चोरुन,
आपलसं केलस तु क्षणात.....

तुच असतेस माझ्या स्वप्नात,
फक्त तुच उरलीस मनात.....

तु तर जग आहेस माझे,
सामावलीस माझ्या रोम रोमात.....

नको जाऊन दूर माझ्यापासून,
हेच सांगायचय मला शब्दात.....

दोन शरीर एक प्राण बनून राहू आपण,
प्रेमनगरीच्या सुंदर जगात.....

नको करुस कुठलेच भांडण आता,
गुंतून जाऊया आपल्या सुखी संसारात.....
♥  ♥  ♥  ♥  ♥

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २१-११-२०१३...
दुपारी ०५,५२...
© सुरेश सोनावणे.....