नपुंसक

Started by विक्रांत, November 21, 2013, 10:13:02 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


गल्लीमधल्या काळूचा
वंश कधीच वाढणार नाही
जगण्याशिवाय जगण्याला
त्याच्या काही अर्थ नाही
लहानपणी केव्हातरी
मुन्सिपालटी घेवून गेली
नस त्याची कापून पुन्हा
होती रवानगी केली
आता काळू माद्यांसाठी
कधीच लढत नाही
घुटमळणाऱ्या माद्यांनाही
मुळीच पाहत नाही
गेट जवळील जागा त्याची
कधीच सोडत नाही
जगतो हीच कृतज्ञता
शेपूट हलवून दाखवत राही
अखेर पर्यंत आपले
अस्तित्व सांभाळणे
देहात कोरून ठेवलेले
वंश सातत्य टिकवणे
जीवनाच्या दोन या
मुलभूत संप्रेरणा
परिपूर्ण करीत असती
अवघ्यांच्या जीवना
जेव्हा पाहतो मी काळूला
फक्त फक्त जगतांना
अन माणसांना मुलांचे
लेंढार घेवून चालतांना
एक अपराध भावना
दाटून येते माझ्या मना
लादलेल्या नपुंसकतेतील
काळू वाटतो उदासवाणा

विक्रांत प्रभाकर

मिलिंद कुंभारे


विक्रांत

सदैव आभारी