स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

Started by मिलिंद कुंभारे, November 22, 2013, 11:11:18 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

वृत्त : आनंदकंद ( गागाल गाल गागा-- गागाल गाल गागा )

स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

आयुष्य थांबल्याचा हलकाच भास झाला
तेव्हा सुरु नव्याने माझा प्रवास झाला ....

स्वप्नामधेच का रे तू भेटशी? कळेना!
प्रत्येक रात्र, दिनही माझा उदास झाला ....

माझ्या मनास वेड्या चाहूल लागली अन् 
असशील भोवती तू हळुवार भास झाला ....

शोधीत श्वास, गंधित क्षण ते, तुझ्यात होते
पण व्यर्थ का असा रे सारा प्रयास झाला ....

मी जीवना तुझा रे! जेव्हा हिशोब लिहीला
त्याचा उगाच माझ्या जगण्यास त्रास झाला ....

मिलिंद कुंभारे

Çhèx Thakare


मिलिंद कुंभारे


sweetsunita66


मिलिंद कुंभारे