एक संध्याकाळ हिरवाळलेली.....

Started by शिवाजी सांगळे, November 23, 2013, 11:20:34 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




दरीने पहाटे आळसावलेल्या,
दुलई धुक्याची पांघरलेली !
नाजुक नक्षी दवकणांची,
पाना फुलांवर विखुरलेली !!

नजर स्थिर माथ्याची,
डोहावर अलगद तरंगलेली !
प्रतिबिंबात डोकावतांना,
कातळ कांती तेजाळलेली !!

घेऊन कडेवर कलरव,
झाडेही सारी सुखावलेली !
आर्त आळवणी मीरेची,
शामल सुरांसह व्यापलेली !!

घेऊन उराशी बदकपिले,
नाव एक विसावलेली !
न्हाऊ घातलेली मेघांनी,
एक संध्याकाळ हिरवाळलेली !!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९