सुट्टीचा दिवस उसंत थोडी

Started by सतीश भूमकर, November 23, 2013, 11:14:40 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

सुट्टीचा दिवस अन उसंत होती थोडी,
म्हणून फिरायला टेकडीवर आली एक जोडी.

पण इकडे आज गर्दी होती भारी,
मग लांब दिसली त्यांना निवांत जागा थोडी.

चालता चालता ती काढायची त्याची खोडी,
तरीही तो तिचा हात कधीही न सोडी.

बसून त्या जागी त्यांनी कुजबुज केली थोडी,
अन डोळे मिटून चाखू लागले मधाची गोडी.

हे बघून आज पुन्हा तुझी आठवण आली थोडी थोडी,
अन थोपवलेलि आसवे गालावर घळघळली ग सारी.

@सतीश भूमकर