योगा योग!

Started by designer_sheetal, November 26, 2013, 02:35:16 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

व्यायाम हि गोष्ट आळशी लोकांसाठी बनलेली नाही. मुळात करावाच कशाला तो व्यायाम! ऑफिस मध्ये काम करताना, ट्रेन ने प्रवास करताना, बस पकडताना, स्टेशन वरचे ब्रिज चढताना उतरताना कमी का होतो व्यायाम. मग कशाला हलवा ते हात पाय उगाचच? छे छे तो आपला प्रांत नाही!  कधी तरी uneasy वाटलं तर शतपावली करण्यापर्यंत ती आमची मजल...त्या पलीकडे जावून माझा कधी "योगाशी"  संबंध येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.

माझ्या एका मैत्रिणी ने योगाचे क्लासेस केले होते. तेव्हा पासून ती मागे लागली होती तूही कर तूलाही छान वाटेल. फार हातपाय मारायला नाही लागत बसल्या बसल्याहि तू करू शकतेस.. वगैरे वगैरे पण आवडच नसल्यामुळे सवड काढण्याचा प्रश्नच नव्हता.

वर्षातून एकदा ते क्लासेस आमच्या इथे होतात. दुसर्या वर्षीही जेव्हा त्या क्लासेस ची जाहिरात आली, madam  पुन्हा मागे लागल्या..हवं तर मी तुझे पैसे भरते..वाढदिवसाचं गिफ्ट समज वगैरे वगैरे .....आता आढेवेढे घेवून ती ऐकणारी नव्हती म्हणून या वेळी हि भानगड काय आहे ते म्हटलं पाहूनच यावं एकदा. जीवावर उदार होवून सकाळी ७.३० च सेशन अटेंड करायचं ठरवलं. रविवारची सकाळ होती, खरं तर सुट्टीचा  दिवस आणि लवकर उठण्याचा काही संबंध नसतो त्यात बाहेर पाउसहि रिपरिपत होता. तरीही मी गेले!  ७.३० च्या सेशनला ८ वाजता पोहोचले. (७.३० ते ७.४५ विचार करत होते जाउ का नको). माझ्यासारखे अजून २/४ लेटलतीफ पाहून जीव जरा भांड्यात पडला नाहीतर उशीर झाला म्हणून घुमजाव करण्याचा विचार चालू होता. शाळेच्या एका वर्गात क्लास सुरु झाला होता. शालेय विद्यार्थानपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्याच वयोगटाची माणसं तिथे होती. लोकांच्या बोलण्यावरून असं जाणवलं कि सगळीच आजकालच्या महागड्या औषधांना आणि क्लिष्ट उपचारांना कंटाळलेली होती आणि त्यांना सहज सोप्या उपचारांची किव्वा माध्यमाची गरज होती आणि म्हणूनच ते योगाकडे वळले होते.

आपल्या शरीरात उपजतच हिलिंग power असते अन  ती कुठल्याही रोगावर सहज मात करू शकते पण तिला योग्य प्रकारे जागृत करावे लागते आणि ते काम योगा करतं. आपल्या शरीरात कधी कधी कॅल्शियम किवा हिमोग्लोबिन आदी ची कमतरता असते त्यासाठी आपण लगेच बाहेरची औषध सुरु करतो पण हे सगळं आपल्याच शरीरात तयार होऊ शकतं कुठलीहि औषध न घेता फक्त योग्य प्रकारचा व्यायाम करून. पण हे जाणून घ्यायला आपल्याकडे वेळच नसतो आपल्याला सगळं instant हवं असतं. १० मिनिटं शांत बसून जर श्वासाचा व्यायाम केला तर त्यातून मिळणारी उर्जा आपल्या शरीराला ३ ते ४ तास पुरते आणि तो कुठेही करता येतो अगदी बस आणि ट्रेन मध्ये सुद्धा.

मध्यंतरी असंच माझ्याकडून न्युरो थेरेपीच सेशन अटेंड झालं होतं. झालं होतं म्हणजे असंच मला जबरदस्तीने तिथे नेवून बसवण्यात आलं होतं. (तो हि रविवारचा दिवस होता भर दुपार आणि ऐन झोपेची वेळ ).  नेणारयाला बरं वाटावं म्हणून ५ मिनिटं हजेरी लावून पळून जायच्या विचारानेच मी तिथे गेले होते.  पण ते सेशन इतकं  इंटरेस्टिंग होतं कि कधी रात्रीचे ८ वाजले हे समजलच नाही. त्यात मिळालेली माहिती खूप इंटरेस्टिंग होती, आपल्या हाताच्या पाचही बोटात पंचमहातत्वाचे गुण असतात आपण जेव्हा पद्मासन करतो तेव्हा हाताची २ बोटं दुमडतो त्या मागेहि शास्त्र आहे..वेगवेगळी बोटं वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये दुमडलि तर वेगवेगळे आजार बरे होतात.

आपल्या शरीरात सतत उर्जा निर्मिती होत असते जर योग्य उर्जा योग्य ठिकाणी केंद्रित केली तर कुठलाही आजार बरा होऊ शकतो. हेच योगाच सार असावं अर्थात त्यात सातत्य आणि पेशन्स हवेत. आणि त्याहि पेक्षा महत्वाचं म्हणजे सारे शारीरिक आजार हे मानसिक आजारातूनच उत्पन्न होतात तेव्हा मन प्रसन्न ठेवणंहि तितकंच गरजेचं आहे.

शीतल
http://designersheetal.blogspot.com
http://kaladaalan.blogspot.in

MK ADMIN

Excellent..extremely informative and encouraging. Thanks for posting.