|| रात नक्षञांची ||

Started by Çhèx Thakare, November 27, 2013, 07:06:38 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  रात नक्षञांची  ||
.
.
झालर हि चांदण्यांची
आज अवकाशी पसरली
हिरे जडीत लवण
संथ पाण्यावर ओसरली
.
.
चमचमणारे ते काजवे
मनसोक्त ऊडू आज लागले
तरंगणारे नक्षञ जणू
प्रृथ्वीतलावर मला भासले
.
.
तो चंद्र असे नभी मला
सूंदर माणिक भासे
लखलखणारया चांदण्यांचा
तो राजा जणू साजे
.
.
वाहणारे ते वारे आज
सर्द मज भासू लागले
अनूभव घेण्यापरी मर्मस्पर्शाचा
हे शरीरच आज जागले
.
.
अशीच चंचल रात मला
रोजपरी लाभो
माया नक्षञांची पाहण्यासाठी
आत्मा रोजच माझा जागो
.
.
©  Çhex Thakare