तुझी माझी ओळख

Started by Sadhanaa, November 28, 2013, 02:58:43 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

जीवनांतील रंग-रूपे

मला कधी दिसली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

प्रीतिची परम ओळख

मला कधीं पटली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

मायेची सांवली कधीं

माझ्यावर पडली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

हृदयाची मंद गति

वेगवान ही झाली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

विरहांतील दारूण दुःखाची

कल्पना मला आली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

विरहाने जीवनाला आलेली

अवकळा हि आली नसती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

जिवंतपणी मरणाची

अनुभूति आली बस्ती ।



तुझी माझी ओळख

जर कधीं झाली नसती

जीवनांत उपेक्षेची

जाणिवही झाली नसती ।।रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_14.html




sanket ghadigaonkar