•|| ञंबक एक गाव ||•

Started by Çhèx Thakare, November 29, 2013, 08:24:00 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

•||  ञंबक एक गाव ||•
.
.
माझ्या शहराच्या जवळ
ञ्यंबक नावाच एक गाव
डोंगराचा त्याला आधारा असून
झाड झूडपांची त्याला छाव
.
.
त्या गावाच वैभव म्हणजे
ञ्यंबक राजाच तिथलं मंदीर
भाव भक्तीत तिमीर होऊन
चंचल मन हि होते स्थिर
.
.
तिथ पाऊस जितका कडक
तितकाच थंड तिथला हिवाळा
असून दूर शहरा पासून
तरीपण असतो आम्हा जिव्हाळा
.
.
दर बारा वर्षे नंतर तिथे
असतो संतांचा मोठा मेळा
अखाडे अनेक तेथे असतात
अदभूत असतो त्यांचा तो सोहळा
.
.
श्रावण मास येते जेव्हा
गाव होते भक्तीमय
भक्ती सोमनाथाची मिळून
गाव होते शक्तीमय
.
.
या गावाची हो ख्याती
खूप दूरवर पसरलेली
या गावाची हो किर्ती
खूप खोलवर पसरलेली
.
.
हे गाव पाहण्या साठी
लोक येतात खूप दूरवरून
ईथल्या माती मधे रूजून
प्रेम घेतात ते भरभरून
.
.
आहे आमंञण तूम्हाला
भेट द्यावी तूम्ही गावाला
घेऊन अठवणी ईथल्या मातीतल्या
नाती जपवी नविन क्षणाला
.
.
©  चेतन ठाकरे

( ञंबकेश्वर बद्दल मला फारशी माहिती नाही जो काही अनूभव अन् थोडीशी माहीती याचा आधारावर कविता केलेली आहे, जर कुठे चुकलो असेल तर क्षमा असावी, शब्द कुठे चुकले असेल तर कळवावे,  योग्य बदल करण्यात येईल.   )

santoshi.world

#1
oye why it posted in shrungarik kavita ??? ::) it is bhakti kavita.....

Çhèx Thakare

nope its nt bhakti kavita , bhakti cha ullekh ahe pan gavache vaishishta dakhavnyacha prayatna kelay me