~ सांजावल मन ~

Started by pujjwala20, November 30, 2013, 05:44:00 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

~ सांजावल मन ~

अशी सांज होते नी...
तुझी आठवण दाटून येते
दिवभराच्या घटनांची मैफल
अपसुखच फेर धरु जाते
मन इवलस माझ
तुझ्या कुशीत शिरु पहाते
भावनांचे कल्लोळ आत
तिथेच शांत विसावेसे वाटते
पण नेमका तू असत नाहिस
सांज अशीच निसटत रहाते
येणातर्या काळ्याकुट्ट अंधारात
जिवाला वेगळीच रुखरुख लागते
तू असा असशील की तू तसा असशील
नेमका तू कसा मन शोधू लागते
तू कधीच व्यक्त होत नाहीस शब्दात
तुझे मुके बोल मीच समजून घेते
तुझ्या विचारात सांजच काय
अखंड रात्रही अशीच जाते
सांजावले मन मग
रात्रीच्या गभ्रात विरुन जाते

-0-0-0-0-0-0-0-
उज्ज्वला पाटील

pujjwala20

मन आजही सांजावलय
पण तो आजही नाही