.....आत्ता कळले!!!

Started by Madhura Kulkarni, December 01, 2013, 01:52:14 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni



नकळत मी ही गुंतत गेले, आत्ता कळले
तुझ्यात मजला मीच गवसले, आत्ता कळले

अडवत होते मी तर वसुली करणाऱ्यांना,
ते तर होते खाकीवाले, आत्ता कळले...

सोसायला शिकवत होती दु:खे मजला,
सुखानेच होते बिघडवले, आत्ता कळले

संधीचे तर केले होते ज्यांनी सोने,
परिस बनाया झिजले होते, आत्ता कळले

दारोदारी भटकत होते न्यायासाठी,
इमान होते त्यांनी विकले, आत्ता कळले

सवाल केले नियतीला मी किती तऱ्हांनी,
उत्तर हि ठरलेले होते, आत्ता कळले