तिचं माणूसपण …………………संजय निकुंभ

Started by SANJAY M NIKUMBH, December 01, 2013, 02:25:20 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तिचं माणूसपण .....................संजय निकुंभ
===================
कां नाकारतोस तू
तिच्यातलं माणूसपण
मानतोस तिला भोगी
उध्वस्त करतोस " स्रि " पण

तिला योनी आहे
हाच कां तिचा गुन्हा
तू हि तेथूनच येतोस
विसरतोस कां पुन्हा पुन्हा

तिच्या शरीराशिवायही
तिच्यात सुंदर खूप असतं
पण तुला कां बंर तिच्यातलं
तेच छिद्र दिसतं

तूच दुर्गा म्हणतोस तिला
तूच म्हणतोस अम्बाबाई
तीच तर असते नां
सगळ्या मानवाची जनाई

मग तरी कां तिच्याकडे
वासनेन पेटून पहात राहतोस
संधी मिळाली कुठे की
कळीसारखी कुस्करून टाकतोस

अरे ! ती फुल झाल्यावरच
माणसांची बाग बहरणार आहे
तिचं अस्तित्व संपल तर
पुरुष कुठे उरणार आहे

तू हि आहेस रे पुरुषा
तिच्याविनाच अधुरा
कां तिला संपवून
स्वतःचा नाश ओढवून घेतोस नरा

जास्त काही मागत नाही
फक्त तिला माणूस मान
मग या जगावर होईलं
खऱ्या अर्थानं माणुसकीच रानं .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १.१२.१३  वेळ  :  १.४५ दु .