आठवितो मी तुज

Started by Sadhanaa, December 04, 2013, 03:32:37 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

आठवितो मी
  तुज एकांती
तुला कां ते
आवडत नाहीं
सुख तेवढे
एकच राहिले
हे कां तुला
उमजत नाहीं ।
कष्टवितो
  काया माझी
जणुं मी शिक्षा
  मला घेतो
कारण अपराध
  घडला त्याचा
विचार मनांस
  जाळित असतो ।
मुक्तामा तूं
  झालीस असतां
दुःख कां तूं
   करून घेतेस
स्वैर भरारी
   घ्यायची सोडून
मागें का तूं
  वळून बघतेस ।
नाहीं आचरिला
  मार्ग मी एकला 
दुःख तुला
  देण्यासाठी
अवलंबिला
  मार्ग हा वेडा
अमर तुझ्याच
  प्रीतिसाठी ।। रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_22.html