आज पुन्हा एकमेकाच्या, प्रेमात पडलो आपण.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 04, 2013, 06:51:04 PM

Previous topic - Next topic
आज पुन्हा एकमेकांना,
खुप बोललो आपण,
आज पुन्हा एकमेकावर,
खुप चिडलो आपण.....

आज पुन्हा एकमेकाला,
खुप भांडलो आपण,
आज पुन्हा एकमेकावर,
खुप ओरडलो आपण.....

आज पुन्हा एकमेकासाठी,
खुप तडफडलो आपण,
आज पुन्हा एकमेकाला,
खुप बडबडलो आपण.....

आज पुन्हा एकमेकासाठी,
खुप रडलो आपण,
आज पुन्हा एकमेकावर,
खुप हसलो आपण.....

आज पुन्हा घट्ट मिठीत,
विरघळलो आपण,
आज पुन्हा श्वासात श्वास बनुन,
खुप गुंतलो आपण.....

आज पुन्हा एकमेकाच्या बहूपाशात,
सामावलो आपण,
आज पुन्हा एकमेकात,
स्वतःलाच विसरलो आपण.....

पण ???

खर सांगायच तर शोनू,
मला कळलेच नाही कधी,
आज पुन्हा एकमेकाच्या,
प्रेमात पडलो आपण.....

आज पुन्हा एकमेकाच्या,
प्रेमात पडलो आपण.....
♥  ♥  ♥  ♥  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१३...
दुपारी ०४,३८...
© सुरेश सोनावणे.....