|| ती वेडी, तो वेडा ||

Started by Çhèx Thakare, December 04, 2013, 08:53:52 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

|| ती वेडी, तो वेडा ||
.
.
कधी ती मला वेडा म्हणते
कधी मी तिला म्हणतो वेडी
या वेडेपणाच्या खेळात
लावतो रोज एकमेकाना लाडीगोडी
.
.
कधी नूसतच हसत असतो
कधी नूसतच रूसत असतो
कधी मैञीच्या या खेळात आम्ही
दोघेही फसत असतो
.
.
कधी तिच्यावर मी रागवणार
कधी माझ्यावर ती रूसणार
पाणवणार डोळे दोघांचे जेव्हा
मर्म-स्पर्शाने तेच पूसनार
.
.
मनात माझ्याही काहीतरी आहे
मनात तिच्याही काहीतरी आहे
मनात जपून भावना आम्ही
मनात प्रेमही दोघांचा आहे
.
.
ति आशेत असते नेहमी
कधीतरी मी तिला प्रपोज करेल
अन
मी सूद्धा आशेत असतो
कधीतरी ती मला प्रपोज करेल
.
.
कोणास ठाऊक अजून किती दिवस
चालणार हा नूसताच खेळ
कधी मिळतील मने आमची
कधी जमेल भावनांचा मेळ
.
.
©  Çhex Thakare