माझ हे अस होत

Started by Nitesh Hodabe, July 23, 2009, 09:34:18 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

===================================================================================================

संध्या काळ जवळ आली कि माझ हे अस होत
तुझी आठवण दाटून येते आणि मन पीस होत

माणसांमध्ये असून सुधा मी अगदी एकता अस्टतो
आडवा वरचा थेंब जसा , त्यावर बसून वेगळा असतो

मला व्याकुळलेला पाहून सूर्य क्षणभर रेंगाळतो
इंद्रधनू होतो आणि सात रंगत ओहारतो

आभाळ झुकत पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा
वार्या वरती लहरत येतो तुझ्या आठवणीचा ठाव

एका एकी दरवळ उठतो रातराणी येते फुलून
तू आता येते आहेस याची मला पटते खून

पेंजनाची छम छम आणि काना मागे तुझे श्वास
चोहीकडे भरून राहतात घमघम नारे तुझे भास

खरच, संध्या काळ जवळ आली कि माझ हे अस होत
तुझी आठवण दाटून येते आणि मन पीस होत

===================================================================================================
===================================================================================================

dhanaji

मला व्याकुळलेला पाहून सूर्य क्षणभर रेंगाळतो
इंद्रधनू होतो आणि सात रंगत ओहारतो  :)
bhau apan tar full fida ya var