वर्षांचा काळ...

Started by Sadhanaa, December 06, 2013, 02:05:26 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

वर्षांचा काळ माझा
युगासारखा गेला
क्षण न क्षण ह्या विरहाचा
मन माझे जाळून गेला

चुकून आलेल्या सुखी क्षणीं
तुला कधी विसरलो नाहीं
जीवनांतील दुःखातही
अन्य विचार आला नाहीं

दिवा स्वप्नी तसेच रात्री
तूंच माझ्या जवळ असतेस
जीवनाला कंटाळतो तेव्हां
तूंच मला विरंगुळा देतेस

स्पर्श तसेच रूप तुझे
आभासातून साकार होते
जीवनांत अपुरे राहिलेले
सुख मला पुन्हां मिळते

राहू दे लोभ असाच
आभासांत अशीच भेटत जा
उरले सुरले जीवन माझे
जगण्यास शक्ती देत जा
रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this...
http://www.kaviravi.com/2013/06/love-poem_23.html