निष्पाप तरुणी.....

Started by भूषण कासार, December 06, 2013, 01:49:24 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार


काळ आज असा आला होता तीच्या अब्रुवरच तो बेतला होता,
वेळ सकाळचीच होती शाळेत जाण्याची लगबग होती,

कामांध तरुणाने तीची वाट धरली होती,
जीव मुठीत घेऊन ती मार्ग शोधीत होती,

थोडे अंतर कापल्यावर आता निर्मनुष्य मार्ग होता,
कामांध तरुणासाठी जणु तो सुवर्ण काळ होता,

क्षणार्धात आता टाहो फुटला वासनेचा पुन्हा एक बळी गेला,
बलात्काराच्या बातमीने पेपर पुन्हा गच्च भरला.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०