अशीच यावी वेळ एकदा ध्यानी मनी नसताना

Started by Nitesh Hodabe, July 23, 2009, 09:45:46 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

===================================================================================================

अशीच यावी वेळ एकदा ध्यानी मनी नसताना
असे घडावे अवचित काही
तुझ्या समीप मी असताना
अशाच एका संध्या काळी
एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चित्त पाखरू
केवळ तुझी नि माझी जवळीक
संकोचाचे रेशम पडदे
हा हा म्हणता वेहून जावे
समय सर्व मंद गतीने
आणि प्रीतीचे सूर जुळावे
मी मागावे तुझिया पाशी
असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तू हवे असताना
शब्द वाचून तुला कळावे
बूज मनी या लपलेले
मुक्त पाने तू उधळून द्यावे
जन्म भारी जे जपलेले
- Sandip Khare

===================================================================================================
===================================================================================================

dhanaji

शब्द वाचून तुला कळावे
बूज मनी या लपलेले
मुक्त पाने तू उधळून द्यावे
जन्म भारी जे जपलेले

bhau......lai bhari jamla ahee...

Shree pawar

Hey dude...
This is not ur poem...
Hi kavita sandeep khare chi aahe...
Plz. Swatachya navane dusryanchya kavita post karu naka...

रणदीप खोटे

अरे हा संदीप खरे म्हणजे डोकेदुखी आहे. इतका फालतू लिहीणारा माणूस लोकप्रिय होतो, हे या समाजाचे अपयश आहे. कविता चांगल्या लिहीव्यात रे सदू. वाचन वाढव रे लेकरा