थडग्यांची बरसात

Started by Arun Dudhamal, December 07, 2013, 10:30:27 AM

Previous topic - Next topic

Arun Dudhamal

थडग्यांची बरसात

रीते मन आकाशी घिरक्या घेते.
त्यास काय माहित साऊली
त्याच्या जन्माचा सुर्य झाला पोरका
मन ही अंधारी फिरक्या घेते.
नभाच्या पोटी जन्मला वैरी
देऊन गेला दुष्काळ दारी
थडग्यांची बरसात अन्
स्मशानाच्या पेटलेल्या चुली
कशी थापावी भाकर
मरतुकड्या बैलाच्या फाटलेल्या झुली.
वेदना त्याची काट्याची टोकदार
कोरडवाहुच राहिली ती माय
तिच्या पदराला ठिगऴे चार...
                      अरुण दुधमल