यक्ष प्रश्न

Started by sweetsunita66, December 07, 2013, 02:14:43 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

  :( :( :( :( :( :( :( :( :(
फुल उमलण्या आधी ,
कुणी हो कुस्करले .
उघडे आकाश बघण्याचे ,
स्वप्न कुणी हो चोरले ?
का सावित्री अन अहिल्या ,
पोरक्या झाल्या जगी ?
का मुलींचा जन्म ,
यक्ष प्रश्न वाटे उगी .
मातेची मायेची ऊब ,
असे कसे हो सर्व  विसरलेत ,
बहिणीची वेडी माया ,
असे कसे हो परके केलेत ?
जर ,यांच्या साठी मनाच्या कप्प्यात ,
जागा असेल बर का  जराशी ,
तर ,जन्मणारी कन्या ,
माय बहिणच असेल ना उद्याची .
का आपल्याच हाताने ,
मारताय पायावर कुऱ्हाडी
जर जगात स्त्रीच नसेल ,
वंश वाढीला लागेल ना बेडी
आपल्याच मानव जातीचा ,
समूळ नाश कराया निघाले
विनाश काले विपरीत बुद्धी ,
हेच का सिद्ध करण्यास निघाले  ???         
                                            सुनिता
                                                    ७डिसेंबर १३

Madhura Kulkarni

Nice one.....Wish some day, all will respect for women & accept her as daughter also.

sweetsunita66

मुली आहेत सुगंधी  फुले
ज्यांची अंतकरणे खुले
राग द्वेष,आणि  लाड दुलार
ज्यांच्या मनामध्ये समावणार
कित्तेक अनंत कोटी भावे
ज्यांच्या अंतकरणी समावे
ती असावी अपुली लाडली
जी परिवाराच्या कुशीत वाढली .......... सुनिता 
     

      धन्यवाद मधुरा !मला कमीत कमी मुलीं कडून तरी ह्यावर अभिप्रायाची अपेक्षा आहे .

Madhura Kulkarni


sweetsunita66


एक रेशिमगाठी

खुप सुंदर आहे.......

जरूर आई ला जशी साथ देतो तशीच साथ देईन प़त्येक स्ञीला.....वचन देतो.......

sweetsunita66