व्यथा प्रेमाची

Started by सतीश भूमकर, December 08, 2013, 08:24:59 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

काय सांगावी गोष्ट
त्यांच्या प्रेमाची......!!

प्रेमपावसात चिंब
भिजलेल्या दोन पाखरांची.....!!

तो म्हणजे राघू अन ती
म्हणजे मैना त्याची.....!!

याला काही होता तिच्या
डोळ्यात धार अश्रुची....!!

अन तिच्या नुसत्या आठवणीने
वाढायची धकधक याच्या काळजाची....

इतकंच अतूट प्रेम होत तर
का ही वेळ आली ताटातूटीची......??

यात चुकी ना तिची,
ना चुकी त्याची.....!!

कारण त्या देवालाच सवय नाही,
दोन प्रेम करणाऱ्यांना मिळवण्याची.....!!

@सतीश भूमकर...