खुप प्रेम करतो मी.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 10, 2013, 07:09:14 PM

Previous topic - Next topic
तिच्या विसरण्यात,
आठवतो मी,
तिच्या आठवण्यात,
विसरतो मी.....
 
तिच्या हसण्यात,
फसतो मी,
तिच्या रडण्यात,
तुटतो मी.....

तिच्या रुसण्यात,
अडकतो मी,
तिच्या बोलण्यात,
गुंततो मी.....

तिच्या लाजण्यात,
शरमतो मी,
तिच्या रागवण्यात,
रडतो मी.....

तिच्या मनवण्यात,
भांडतो मी,
तिच्या भांडणात,
मानवतो मी.....

कारण ???

ती फक्त माझी आहे,
आणि माझीच राहणार,
तिच्यावर मनापासून,
खुप प्रेम करतो मी.....

I Love You Shonu...
[♥]   :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १०-१२-२०१३...
सायंकाळी ०७,०१...
© सुरेश सोनावणे.....