प्रेमात....

Started by anolakhi, July 25, 2009, 06:56:15 PM

Previous topic - Next topic

anolakhi

प्रेमात नेहमी असेच होत,
कधी तिला वाटते,त्याने काहीतरी बोलावे,
कधी त्याला वाटते तिने काहीतरी बोलावे,
आणि मग या अबोलात,
दोघे बरेच काही बोलतात.

प्रेमात नेहमी असेच होत,
कधी-कधी प्रेमी एक-मेका पासून दुरावातात,
मग त्याला वाटते,तिने माझ्या जवळ यावे,
तर तिलाही वाटते त्याने मला जवळ करावे,
आणि मग या दुराव्यात,
दोघाताले सर्व अंतर संपतात.

प्रेमात नेहमी असेच होत,
प्रेमी एक-मेकांशी खुप भांडतात,
मग तिला वाटते त्याने माझे रुसवे काढावे,
तर त्याला वाटते तिने मला समजुन घ्यावे,
आणि तरीही या गैर-समजुतित,
दोघांची मने एक-मेकाना समजतात.

प्रेमात नेहमी असेच होत,
खर प्रेम कळतच नाही,
कळले तरी रुसव्या-फुगाव्यात ते व्यक्त करायचे राहून जाते,
मग कधी-कधी उशीर होतो,
आणि मग ....
आणि मग आपण एक-मेकाना आठवत असतो....


rugved

Hey........
Kharch Aasach Hota...
Thanks..... :)

nirmala.


PRASAD NADKARNI


sumitsum10


gaurig

Very true one.......nive one..... :)