मी अरुणा शानबाग बोलतेय

Started by SANJAY M NIKUMBH, December 11, 2013, 06:46:08 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी अरुणा शानबाग बोलतेय
====================
मी खितपत पडलेय कित्येक वर्षापासून
मी जगतेय की मरतेय
हि सुद्धा जाणीव नाही माझ्या मनास 

माझचं जगणं ओझं झालंय
हे हि सांगायच्या मनस्थितीत नाही मी
या यातनातून सोडव रे देवा
हे हि मागणं कित्येकदा मागून बघितलं मी
पण तो कां झालायं इतकां निष्ठुर
काहीच कळतं नाहीये मला

किती धावा केला होता मी त्याचा
त्या भयानक प्रसंगावेळी
पण तो नाहीच आला
फक्त माझी अब्रू वाचवायला गेले
अन हे सारे भोग माझ्या नशिबी आले

किती सुंदर स्वप्न पाहिली होती मी
सुखी संसाराची
किती अधीरता लागली होती मनाला
ती घटिका जीवनात येण्याची

पण खरंच माझं प्राक्तन असंच असेलं कां ?
मी जन्मल्यावर सटवाईने
माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल कां ?
हे कुठल्या जन्माचे भोग आहेत
कि फक्त पुरुषप्रधान संस्कृतीचे चटके आहेत

कधी कधी तर वाटतं नां
मी त्याला शरण गेले असते तर ?
पण मग माझ्या जीवनात असलेल्या पुरूषाच कायं
त्यानं स्वीकारलं असतं कां मला
कि मीच स्वतःला नालायक ठरवलं असतं
 
तो तर कुठेतरी
सुखी संसारात रममाण झाला असेलं
चांगली अद्दल घडविली तिला
असं म्हणून आनंदाने जगत असेलं

कायदा पण किती दुबळा ठरलाय ना माझ्या बाबतीत
माझी काहीच चूक नसतांना 
सजा भोगतेय जिवंतपणी मरणाची
मी आशाही करू शकत नाही इच्छा मरणाची .
==============================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १.१२.१३  वेळ  : ४.१० दु.