पाऊस गाणं ...

Started by शिवाजी सांगळे, December 14, 2013, 10:51:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस गाणं ...

पाण्यातील ढग  सरकतांना,
पाखरू शिळ वाजवीत होतं !

झाडावर विसावलेले पाऊस थेंब,
मनही आठवणीत चिंब होत !

असच असत पावसाच,
जोरकस येते सर कधी-कधी !

असते एखादी संततधार,
तुझ्या आठवणी सारखी अगदी !

भिजायचं असत सरीमध्ये,
विसरायची स्वत:ला सवय होते !

इतरांच कस काय सांगू?
माझी पावसाशी गट्टी होते !



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Vivek Karandikar

पहिला पाउस :

पाउस कधी येणार कळेना, संध्याकाळीही उकडते फार
गरम हवा किती वाहते, कुठे गेली हवा ती गारगार

अन अचानक आश्चर्य झाले, एकदम ढगाळून आले
माझ्या हातात कागद आणि मनी हे कोठून शब्द आले

पावसाचे गाणे लिहीन म्हणतो पण हरवली माझी लेखणी...
ती बघा छान तिरीप ढगाआडून, अंधाराला घालते गवसणी

त्या तीरीपेने केले कौतुक, सांजवेळेशी लाडिक भांडण जणू
मेघाबरोबर हलकेच करून सलगी, तिने सोडिले इंद्रधनू

बघता बघता जादू झाली, मनामनाची मरगळ गेली
भाग घेतला संध्येनेही, खेळामध्ये टवटवी परतली

दमलेली, उकडलेली माणसे, पाहून हे हरखली
मनोहारी संध्या पाहुनी, घरातुनी ती बाहेर पडली

खेळगडी असे जमलेले पाहून, ढगालाही आली हुक्की
गम्मत करण्या थोडी त्याने, गारांची मग मारली फक्की

खेळगडी मग हर्षून गेले, पहिल्या पावसात भिजू लागले
इंद्रधुनसह नभीचा मेघही, त्या हर्षाने गालातच हसू लागले

....
विवेक

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९