तुलाच बदलावे लागेल

Started by SANJAY M NIKUMBH, December 14, 2013, 11:09:48 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुलाच बदलावे लागेल
==============
भावनांवर तुझ्या
नियंत्रण तुझेच रहावे
ढळलेल्या मनास तुझ्या
तूच रे सावरावे

मनात रुतलेल्या
वासनेस बाहेर काढावे
मोलं तुझ्या आयुष्याचे
तूच रे जाणावे

जरी वाटे तुज आकर्षण
ते मनात ठेवावे
"स्री" कडे पाहण्याच्या
नजरेस तू बदलावे

वाटेल ती हवीशी
प्रेमाने तिला जिंकावे
कां भावनेच्या भरात
कायद्यात अडकून जावे

क्षणभंगूर या सुखासाठी
आयुष्य कां नासवावे
खानदानाचे नावं असे
मातीमोल कां करावे .
-----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १.१२.१३ वेळ : १२ . ३० दु.