मी हि आहे माणूस

Started by SANJAY M NIKUMBH, December 15, 2013, 05:19:51 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी हि आहे माणूस
=======================
माझ्या न दिसणाऱ्या योनिकडे पाहून
तू जिभल्या चाटत असतोस
माझे वक्ष झाकलेले असतांनाही
तू डोळे विस्फारून पाहतोस

दिसते तुझ्या डोळ्यांत मला
लालसा फक्त माझ्या शरीराची
म्हणूनच सजा भोगते मी
खाली मान घालून चालण्याची

मी घातलेली असते साडी
तेव्हा जाते तुझी नजर उघड्या पोटाकडे
कधी घातला खोल गळ्याचा ब्लाउज
तर अधाशासारखा पाहतोस तू पाठीकडे

जरी मी घातलेला असतो सलवार कुडता
तरी तू डोकावतोस माझ्या गळ्यामध्ये
अन घातलीच मी जीन्स तर
पहातो वेड्यासारखा माझ्या ढूंगनाकडे

घालता मी आखूड चड्ड्या
पाहतो माझ्या मांड्यानकडे
काय घालू मी आता
मजलाच पडलेय रे कोडे

म्हणजे तू आहेस म्हणून
मला मनासारखं नाही वावरता येणार
मी कसं जगायचं हे हि
तूच आता ठरवणार

तू हि कसाही राहतोस
मी कधी आक्षेप घेतला कां रे
मग माझ्याच जगण्याला
तुझ्या बेड्या कां रे

मी हि आहे माणूस
मला स्वच्छंद होऊन जगू दे ना
होईन कधी मुक्त मी
मला मोकळा श्वास घेऊ दे ना .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १ . १२ . १३ वेळ : ३ .०० दु .

अर्जुन

संजय उवाच --

माझ्या न दिसणाऱ्या योनिकडे पाहून
तू जिभल्या चाटत असतोस
इत्यादी इत्यादी


अर्जुन उवाच --

"स्त्रीदाक्षिण्या"ची सकल कवने तव, संजय
करती प्रकट तव अंतर्मनीच्या झगड्यांचा संचय
अंतर्मनव्यापारांना ऐशा म्हणती "प्रोजेक्शन"
जाण ते, संजय, जाणते मानसशास्त्राचे जन

shelke t s

sanjayaji shabd jari todke modake aasle tari bhawana kharya aahet aani yachich swatala purush manun ghenarya gandana (6 no.)laj watavi hich aapeksha....