शेवटी

Started by केदार मेहेंदळे, December 16, 2013, 11:46:46 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

गझल : शेवटी
वृत्त - कालगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

भांडलो दोघे जरी डोळ्यात पाणी शेवटी
मी तुझा राजा, घराची, तूच राणी शेवटी!

संकटे आली जरी ना साथ सुटली ही कधी
मी तुला अन तू मला ही प्रेमगाणी शेवटी

पाच अंकी वेतनाने मी करामत साधली
फेडले हप्ते.... उरवली... चार नाणी शेवटी

वाढला बाजार तेंव्हा घेतले समभाग जे...
कागदाची आज त्या... वाजे पिपाणी शेवटी!

बांधले सरकार त्यांनी देश राखाया जरी
देश ते लुटतील अन लुटतील खाणी शेवटी

वेचले आयुष्य ज्यांनी राखले देशास या
एक पुतळा धूळ भरला ही निशाणी शेवटी
 
भोगले आयुष्य सारे, भोगतो ते आजही
काय उरले... काय सरले... गा विराणी शेवटी!

मी प्रवाहा सारखा नी तू किनार्या सारखी
तू सती ''केदार'' मी, कळली कहाणी शेवटी


केदार ....

मिलिंद कुंभारे

chan.....mastach aahe gazal.... :)

शिवाजी सांगळे

मस्त, मित्रा ....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Çhèx Thakare


sweetsunita66