मी भेटेन तुला पुन्हा पुन्हा

Started by vicky02810, December 16, 2013, 06:27:06 PM

Previous topic - Next topic

vicky02810

अनोळखी वाटा
झाल्या मंद दिशा
तोडून पाश सारे
मी भेटेन तुला पुन्हा पुन्हा

तुझे स्मित हास्य
भासे शांत नदीचा किनारा
मारून वल्हे त्यावर मी
हाकिन तारू पुन्हा पुन्हा

गाली न थांबला
तो थेंब ओठावर स्थिरावला
त्यास छेडून मी एकदा
हवेत उडवले पुन्हा पुन्हा

केसात माळ केवडयाची
गंध दाटला चारी दिशेला
भेदून सागर तट मी
तो क्षितिजाला नेला पुन्हा पुन्हा

नाद पैंजणाचा तुझ्या
चाहुल देतो तुझ्या येण्याची
वारा मी एकदा होऊन तो
ब्रम्हांडी नेला पुन्हा पुन्हा

डोळ्यातील काळी काजळी
सांगते रात्र मिलनाची
एक काजळ घेऊन मी
त्या रात्रीला लाजवेन पुन्हा पुन्हा

-दर्यासारंग

मिलिंद कुंभारे



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]