वेडा झालो मी

Started by SANJAY M NIKUMBH, December 17, 2013, 05:48:10 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

वेडा झालो मी ..................संजय निकुंभ
===========
वेडा झालो मी
खरचं
वेडा झालो मी

सतत तुझे भास
होतात माझ्या मनास
कुठेही पाहिलं तरी
दिसते तूच काळजास
इतकां कसा तुझ्यात
गुंतून गेलो मी

वेडा झालो मी
खरचं
वेडा झालो मी

घडता तुझा सहवास
तू स्पर्श केला मनास
तूच माझी प्रिया
जाणवले माझ्या हृदयास
कळले नाही कधी
तुझा झालो मी

वेडा झालो मी
खरचं
वेडा झालो मी

तुझाच विचार तुझीच धुंदी
विसरत गेलो मलाच
जेव्हाही उमलल्या पापण्या
पाहिले मी तुलाच
तुझ्यात होतचं काही खास
म्हणून प्रेमात पडलो मी

वेडा झालो मी
खरचं
वेडा झालो मी .
----------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि.१७ .१२ .१३ वेळ : ५ .३० स.