लग्नाचा तो प्रसंग गोड

Started by Sadhanaa, December 17, 2013, 01:17:27 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

लग्नाचा तो प्रसंग गोड

जीवनांत तो एकदा येतो

दोन जीवांच्या बरोबरच

दोन घरांचे मीलन करतो ।


परंतु ह्या संस्कारांचा

विसर आम्हां पडला आहे

विवाह म्हणजे आतां फक्त

एक बाजार बनला आहे ।


लोक सुशिक्षित होऊनही

हुंड्याची प्रथा चालूच आहे

मान पान -देणे घेणे

ह्यांचे अवडंबर कायम आहे ।


घरांत लक्ष्मी येणार म्हणून

दारांत माप ठेवले जाते

अशा मंगल प्रसंगीही

वादंग मात्र उठविले जाते ।


घरांत येणाऱ्या वधू कडून

तरीही अपेक्षा केली जाते

आपुलकी-प्रेम निर्मिण्याची

तिच्यावर जबाबदारी पडते ।


सुशिक्षितांची ही तरहा तर

अशिक्षितां बद्दल बोलू काय

क्षणा क्षणाला असमाधान

त्यावर शिव्या हाच उपाय ।


शिव्या जेव्हां कमी पडतात

हात तेव्हां चालू लागतात

मंगल प्रसंग विसरून जाऊन

धुमचक्री माजते त्यांच्यांत ।


विवाह प्रसंगी एके काळी

गांव जेवण घालत होते

आतां मात्र जेवणा पेक्षां

दारुस महत्व दिले जाते ।


विवाहांतील मांगल्य गेले

आता फक्त हौस उरली

दाम-डौल-मान-पान

दाविण्याची संधि राहिली ।


सुशिक्षित वा अशिक्षित

दोघांत विचार उरला नाहीं

विवाह बाजार-मौज होऊन

त्यांत मांगल्य उरले नाहीं ।।रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास...Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_28.html