लहानपणी वाटे एक बहिण असावी...

Started by Pedhya, December 18, 2013, 02:43:25 PM

Previous topic - Next topic

Pedhya

लहानपणी वाटे
एक बहिण असावी...
एक
गोळी तीला चिमणीच्या दाताने
तोडून द्यावी.
उरलेली अर्धीही तीलाच
द्यावी.
एक बहिण असावी...
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी खावी.
नंतर मात्र तीलाच एक ठेउन
द्यावी.
एक बहिण असावी...
चीडवायला तीला फार
मजा यावी.
पण रडू ती लागताच
जिवाची घालमेल व्हावी.
एक बहिण असावी...
पहिल्या माझ्या पगारात
तीला छान गिफ्ट आणावी.
आणि गिफ्ट हातात पडताच तिने
वर पार्टीही उकळावी.
एक बहिण असावी...
असेच आणि बरेच नेहेमी मला वाटे.
एक बहिण असावी...
पण?
मला बहिण का नसावी?
त्यामुळे
राखी पोर्णिमा माझी सूनी सुनी जावी....
आणि अचानक...
आयुष्यात माझ्या एक
छोटुकली यावी.
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून
सख्खी वाटावी.
एक बहिण यावी...
तीच्याशी बोलताना माझी सुख
दुख्खे सांगावी...
सांगता सांगता तीचीही जाणून
घ्यावी...
खरंच घर मुलीशिवाय अपूर्ण असत....
SanchuPrem

Çhèx Thakare