मी पुन्हा येणार नाही...

Started by Pedhya, December 18, 2013, 02:56:05 PM

Previous topic - Next topic

Pedhya

का रडतेस आता आणि कशासाठी ?
कोणीतरी सांगितले रडलीस फक्त
माझ्यासाठी..
तेव्हा तर हसत हसत मला दूर केले,
मग आता रडून दाखवून तू काय सिध्द
केले..
जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा,
मला तर एकट्यालाचं सोडले..
मात्र
तुझ्या सोबतीला कोणीतरी होते,
म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..
आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस माझी परत
येण्याची..
नको रडून मजबूर करूस मला परत
येण्यासाठी,
कारण ?????
आता मी पुन्हा येणार नाही ते
दुःख सोसण्यासाठी.

SanchuPrem