तुला आठवू पाहतो मी

Started by मिलिंद कुंभारे, December 18, 2013, 04:25:55 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

तुला आठवू पाहतो मी

कधी बंध तुटले, कधी स्वप्न विरले
निसटले कसे क्षण सुखाचे, कळेना ....

कधी पाश सुटली, कशी प्रीत विटली
हरवले कुठे दिस गुलाबी, कळेना ......

कितीदा तुला रोखले, साहले मी
तरीही तुझी पावले का वळेना? ......

कितीही मनाशी ठरवले जरी मी
तुला विसरण्याचे मला का जमेना?......

जरीही बदलली दिशा तू स्वत:ची
तरी का मला आठवे तू? कळेना ......

मिलिंद कुंभारे

शितल


मिलिंद कुंभारे

शीतल,
धन्यवाद.....प्रतिसादबद्दल.....