…जराशी….जराशी

Started by केदार मेहेंदळे, December 18, 2013, 05:35:49 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

येता समीप तू जडावून थोडी
फुलू लागली रात....जराशी....जराशी

सैलावून येता तू मिठीत माझ्या
बिलगून बहरली....जराशी....जराशी

फुलवून स्पर्शाची फुले साजणी तू
चढवली नशा ही....जराशी....जराशी

पेटवित गेली तू गात्रांस माझ्या
अशा नग्न रात्री....जराशी....जराशी

प्रणयात भिजुनी हुंकारली  तू ...
शरीरावर ग्लानी....जराशी....जराशी

दमून दोघे.... कोसळलो सुखानी
सरुदे अशी रात....जराशी....जराशी

वळली थकून तू दुसर्या कुशीला
हवी साथ अजुनी....जराशी....जराशी

विझलीस अशी का इतक्यात राणी
अजुनी रात बाकी....जराशी....जराशी



केदार....

शिवाजी सांगळे

क्या बात है केदार,

विझलीस अशी का इतक्यात राणी
अजुनी रात बाकी....जराशी....जराशी
.......

हुंकार ऐकण्यासाठी तूझा मधुर तो,
ये ना कुशीत अजून...जराशी....जराशी
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शिवाजी सांगळे

Thanks Kedar, this makes supporting and positive insperation to all.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

येता समीप तू जडावून थोडी
फुलू लागली रात....जराशी....जराशी


     छान ...........

शिवाजी सांगळे

पुन्हा म्हणावसं वाटत ....

हुंकार ऐकण्यासाठी तूझा मधुर तो,
ये ना कुशीत अजून...जराशी....जराशी
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९