माझा विश्वास आहे जादूटोण्यावर

Started by SANJAY M NIKUMBH, December 18, 2013, 07:26:52 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

माझा विश्वास आहे जादूटोण्यावर
======================
ज्याचा विश्वास नसेल जादूटोण्यावर 
त्यांनी मला येऊन भेटावं
माझी दशा पाहिल्यावर
आपलं मत नोंदवावं

मी कां झालोय भ्रमिष्ट
हे जाणून घ्यावं
अन मग जादूटोणा बकवास आहे
हे सांगत सुटावं

पण मला पाहिल्यावर 
तुमची खात्री होऊन जाईल
जादूटोणा अस्तित्वात आहे
हे साऱ्यांना कळून जाईल

उगीच नाही लागलं वेड
मला तिच्या प्रेमाचं
जे गारुड झालंय माझ्या मनावर
ते भूत आहे तिच्या जादूटोण्याचं

हो ! खरचं केलीयं तिनं माझ्यावर जादू
कधी तिच्या नजरेतून
कधी तिच्या हसण्यातून
कधी गोड बोलण्यातून
कधी सुंदर स्वभावातून

म्हणून तिच्या जादूटोण्यात
असा काही गुरफटलोयं की
मी एकटाच हसत असतो     
एकटाच बोलत असतो
माझं अस्तित्व विसरून
तिचा होऊन जगत असतो

तिचचं राज्य असतं जगण्याच्या प्रत्येक क्षणांवर
म्हणूनच माझा विश्वास आहे जादूटोण्यावर
------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १८ .१२ .१३  वेळ : १२.३० दु.         


Kamble Rajratan mugaonkar

तुझ्यावर प्रेम केले सांग काय चुकले माझे                             तूझ्याबरोबर राहण्याचे स्वप्न बघितले सांग काय चुकले माझे                       एक चांगला जिवनसाथी होण्याचा प्रयत्न केला सांग काय चुकले माझे                        अंधारमय जिवनात एक आशेचा दिप होण्याचा प्रयत्न केला सांग काय चुकले माझे                    प्रत्येक वेळी तुझाच विचार केला सांग काय चुकले माझे