|| पिरमाचा ख्येळ ||

Started by Çhèx Thakare, December 19, 2013, 08:02:35 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

|| पिरमाचा ख्येळ ||
.
.
काय फ्याशन वाल्या पोरी,
काय भलताच त्यांचा नखरा
ख्येळ ख्येळून नूसता नजरेचा,
भल्या भल्यांचा बनतो कि हो बकरा
.
.
पोर बिचारी आपली भोळी, 
मनात विचार त्यांचा भोळे
लागून नादाला या पोरींचा जिवन, बणूनच घेता कि हो काळे
.
.
पोरींन यक स्माईल काय दिली,
यांचा मनात लाडूच काय फूटतो
पोरीला  ईम्प्रेम करण्या पाई,
पोराचा जिवच नूसता हो तूटतो
.
.
दोस्ता कडून पैक ऊधार घेणार,
पोरीचे चोचले लई पूरवणार
पोरीला ड्रेस नविन घ्यवून,
बाई सोबत चार ठिकाणी मिरवणार
.
.
ईथ बिचारयाचा मनात ती,
स्वप्न लग्नाच यडं पाहतं
पोरीच्या मन लागलेलं दूसरीकड,ं
तिच्या स्वप्नातच दूसर कोणी राहतं
.
.
मग हळू हळू कळत वेड्या खूळ्याला,
कि पिरमात पडनार व्हता आपला बळी
मग काडून फ्येकावी आपल्या मनातून,
ति फूलणारी प्र्यमाची कि हो कळी
.
.
हळू हळू यते अक्कल जिवाला,
कि पिरमात चांगल्या चांगल्यांची झाली हो झीज
राजे महाराजे फस्त झाले याच्यात,
मग आम्ही तरी कूठल्या मातीतले हो बीज
.
.
मानतो आभार तूझे द्यवा,
मला लवकर तू सावरलं
माझ्या अडमूठे प्र्यम ख्यळाला,
खरच लवकर तू रे आवरलं
.
.
©  Çhex Thakare