स्वप्नं

Started by Pedhya, December 20, 2013, 09:14:51 AM

Previous topic - Next topic

Pedhya

खूप बघितली आहेत स्वप्नं
निदान एक तरी पूर्ण होऊ दे
उसळणाऱ्या या लाटांत
मला आत्ता तरी किनारा मिळू दे

स्वप्नातल्या या नगरी
प्रत्यक्षात तरी दिसू दे
दुःख भरलेल्या या जीवनात
सुखाचे क्षण तरी येऊ दे

स्वप्नातला इंद्रधनुष्य
घरातीवर आता उतरू दे
सार्र्या सात त्याच्या रंगात
मला आता रमू दे......
SanchuPrem