या कातर वेळी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 20, 2013, 07:38:25 PM

Previous topic - Next topic
या कातर वेळी,
पाहीजेस तु जवळी.....

मी समोर येता तुझिया,
पडावी गालावर खळी.....

एकटक पाहताच तु मजला,
खुलावी तुझिया चेह-याची कळी.....

करुनी सुखाची बरसात मजवर,
दु:खातून रिती व्हावी झोळी.....

मिठीत कवटाळून तुझिया,
प्रेम रंगाची साजरी करूया होळी.....

तोडूनी तू आज बंध सारे,
खेळावी मज सोबत प्रेमाची खेळी.....
♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

स्वलिखित -
दिनांक २०-१२-२०१३...
सायंकाळी ०७,३३...
© सुरेश सोनावणे.....