वचन

Started by vikrantborse, December 24, 2013, 01:07:43 AM

Previous topic - Next topic

vikrantborse

वचन
माझ्यातल्या मला मी कधीच मारून टाकल,
सरणावर नेउन मी त्याला कधीच जाळून टाकल.
त्याच्या साध्या अस्थिहि मी गोळा केल्या नाहीत,
अश्रूंच्या गंगेत मी त्यांना वाहूहि दिल्या नाहीत.
कस समजावणार होतो मी त्याला, त्याच असन मला जेपणार नव्हत,
त्याला हवतस विश्व उभारण, मला खरच शक्य नव्हत.
आता त्याच भूत माझ्या मानगुटीवर बसून असत,
मिळेल तेव्हा, मिळेल त्या क्षणी, मला सतत पिडत असत.
मग त्याला मी एक वचन देऊ केल,
तेव्हा कुठे जाऊन त्याने माझ छळण कमी केल.
वचन-"सरतेशेवटी काही दिवस केवळ तुझेच असतील,
माझे तुझ्या अवतीभोवती पुसटसे पडसादही नसतील."
तेव्हा कुठे जाऊन त्याने मला जीवनदान दिल.
तेव्हा कुठे जाऊन त्याने मला जीवनदान दिल.
--रत्नप्रवि--