चित्र

Started by vikrantborse, December 24, 2013, 01:22:00 AM

Previous topic - Next topic

vikrantborse

चित्र
कधीकाळी मीही फार सुरेख चित्र काढायचो,
गडद, फिकट रंगाशी रंग रंग खेळायचो.
कधी तिच्या आठवणींचे मधुर रंग निवडायचो,
रिक्त अश्या जागा लगेच भरून द्यायचो.
नाजूक साजूक जागांसाठी बारीक ब्रश घ्यायचो,
अल्लद ब्रश फिरवत चित्र पूर्णत्वास न्यायचो.
उण उण वाटलंच तर मग पुन्हा तिला स्मरायचो,
तिच्याच आवडत्या रंगाशी मग रंग रंग खेळायचो.
खरच .... कधीकाळी मीही फार सुरेख चित्र काढायचो....
--रत्नप्रवि--